Ad will apear here
Next
‘मत्स्य’च्या विद्यार्थ्यांना कोकण कृषी विद्यापीठाच्याच पदव्या
मुंबई : महाराष्ट्र कृषी विद्यापीठ अधिनियम १९८३ आणि महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अधिनियम १९९८च्या कलम नऊमध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. ही बैठक चार जून २०१९ला झाली.

रत्नागिरीतील शिरगाव येथील मत्स्य विज्ञान महाविद्यालयातून अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना १७ नोव्हेंबर २००० नंतर डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाकडून देण्यात आलेली पदविका प्रमाणपत्रे व पदव्या पूर्वलक्षी प्रभावाने विधिग्राह्य करण्यास बैठकीत मान्यता देण्यात आली. हा निर्णय महाराष्ट्र कृषी विद्यापीठ अधिनियम १९८३ आणि महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अधिनियम १९९८च्या कलम नऊमध्ये सुधारणा होईपर्यंतच्या कालावधीसाठी लागू राहणार आहे. त्याचप्रमाणे मत्स्यविद्या शाखेतील पदविका, पदवी, पदव्युत्तर व आचार्य इत्यादी पदव्या देण्याचे अधिकार अपवाद म्हणून डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठास देण्यासही मान्यता देण्यात आली.

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अधिनियम १९९८नुसार नागपूर येथे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आहे. या अधिनियमातील कलम नऊमध्ये असलेल्या तरतुदीनुसार कृषी विषयातील पदवी व पदविका प्रमाणपत्र देण्याचे अधिकार कृषी विद्यापीठांना आहेत. या अधिनियमानुसार शिरगाव येथील मत्स्य विज्ञान महाविद्यालय, तसेच पशु व मत्स्य विज्ञानाशी संबंधित इतर महाविद्यालये, संस्था, प्रशिक्षण केंद्र, संशोधन केंद्र यांना महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठांशी संलग्नित करण्यात आले आहे. 

तथापि, १७ नोव्हेंबर २०००च्या अधिसूचनेनुसार शिरगाव येथील मत्स्य विज्ञान महाविद्यालयास पूर्वीप्रमाणेच डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाशी संलग्नित करण्यात आले; परंतु, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विज्ञापीठ अधिनियम १९९८आणि महाराष्ट्र कृषी विद्यापीठे अधिनियम १९८३च्या कलमांमध्ये आवश्यक त्या सुधारणा न केल्यामुळे शिरगाव येथील महाविद्यालयातून पदविका, पदवी आणि आचार्य हे अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना १७ नोव्हेंबर २०००नंतर देण्यात आलेल्या पदव्या विधिग्राह्य ठरत नव्हत्या. या वस्तुस्थितीचा विचार करता १७ नोव्हेंबर २००० ते संबंधित दोन्ही अधिनियमातील कलम नऊमध्ये सुधारणा होईपर्यंतच्या कालावधीमध्ये डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाकडून प्रदान केलेल्या पदविका, पदवी प्रमाणपत्रे पूर्वलक्षी प्रभावाने विधिग्राह्य करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/FZXJCB
Similar Posts
मत्स्यव्यवसायाच्या विकासासाठी आवश्यक संशोधनाची चर्चा रत्नागिरी : ‘शाश्वत मासेमारी आणि मत्स्य संवर्धन विकास : आव्हाने आणि संधी’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषद रत्नागिरीतील शिरगाव येथील मत्स्य महाविद्यालयात सध्या सुरू आहे. या परिषदेच्या दुसऱ्या दिवशी (१८ जानेवारी २०१९) सकाळी शाश्वत उत्पादन प्रणालीसह विविध विषयांवरील चर्चासत्रे पार पडली. दापोलीच्या डॉ.
‘मत्स्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी व्यवस्थापनात ठसा उमटवावा’ रत्नागिरी : ‘मत्स्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मत्स्यउद्योगामध्ये मोठे योगदान दिले आहे. ३९ वर्षे या महाविद्यालयातून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी विविध निर्यात कंपनी, मत्स्यसंवर्धन आदी क्षेत्रांत कार्यरत आहेत. आता मत्स्य संवर्धनाबरोबरच मत्स्यबीज विक्री, प्रोबायोटिक्स विक्री, औषध विक्री आदी कंपन्यांमध्ये
मत्स्यसंवर्धनाच्या शाश्वत विकासातील आव्हानांचा वेध घेणारी आंतरराष्ट्रीय परिषद रत्नागिरीत सुरू रत्नागिरी : ‘शाश्वत मासेमारी आणि मत्स्य संवर्धन विकास : आव्हाने आणि संधी’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेला रत्नागिरीतील शिरगाव येथील मत्स्य महाविद्यालयात १७ जानेवारी २०१९ रोजी सुरुवात झाली. २० जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या परिषदेत मत्स्य शाखेशी संबंधित विविध विषयांवर चर्चा होणार आहे.
रत्नागिरीच्या मत्स्य महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय परिषद रत्नागिरी : दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाअंतर्गत असलेले रत्नागिरीतील शिरगाव येथील मत्स्य महाविद्यालय व दापोलीतील इंटर डिसिप्लीनरी सोसायटी फॉर अॅग्रीकल्चर सायन्सेस अॅंड टेक्नॉलॉजी (ISASaT) यांच्या संयुक्त विद्यमाने मत्स्य महाविद्यालयात ‘शाश्वत मासेमारी आणि मत्स्य संवर्धन विकास :

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language